रत्नागिरी : रत्नागिरी नगर परिषदेतील तीन अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या. रनपमध्ये आधीच अनेक अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत, त्यात या तीन अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्याने राहिलेल्या अधिकाऱ्यांवर आणखी अतिरिक्त कार्यभार येणार आहे.
रत्नागिरी नगर परिषदेचे उपमुख्याधिकारी प्रवीण माने यांची चिपळूण नगर परिषदेत बदली झाली. पाणीपुरवठा विभागाचे अभियंता अविनाश भोईर यांची खोपोली नगर परिषदेत
बदली झाली. त्यांच्याकडे रत्नागिरी नगर परिषदेच्या पाणी विभागासह आरोग्य विभागाचा कार्यभार होता. मालमत्ता विभागातील अधिकारी नंदकुमार पाटील यांची गडहिंग्लज येथे बदली झाली आहे. त्यांच्याकडे मालमत्ता विभागासह पाणीपट्टी वसुली विभागाचा कार्यभार होता. रत्नागिरी नगर परिषदेत अधिकारी, कर्मचाऱ्यांची अनेक पदे रिक्त आहेत. अनेक विभागांचा कार्यभार कंत्राटी कामगार सांभाळत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:53 28-09-2024