लांजा : रत्नागिरी शहराच्या धर्तीवर लांजा शहरलाही स्मार्ट सिटी बनविण्याचा संकल्प असून, महायुती सरकारच्या माध्यमातून रचनात्मक विकासकामे वेगाने मार्गी लागत आहेत. त्यामुळे येत्या काही काळात विकासकांमानी परिपूर्ण असलेले लांजा शहर पाहायला मिळणार आहे, असे प्रतिपादन सिंधुरत्न समितीचे सदस्य किरण सामंत यांनी शहरातील स्वामी स्वरूपानंदनगर, नामदेवनगर, वैभव वसाहतमधील नागरिकांच्या अडचणीसंदर्भात आयोजित केलेल्या बैठकीत केले.
पालकमंत्री उदय सामंत यांच्या माध्यमातून लांजा नगरपंचायत आणि राजापूर नगरपरिषदेला ५० कोटींची विकासकामे निधी मंजूर झाल्याचे किरण सामंत यांनी सांगितले. बैठकीप्रसंगी नगराध्यक्ष मनोहर बाईत, विधानसभा क्षेत्राध्यक्ष राजू कुरूप, तालुकाध्यक्ष गुरुप्रसाद देसाई, एस. एन. कांबळे, सचिन डोंगरकर, दूर्वा भाईसेटे, प्रसाद भाईशेटे, नंदराज कुरूप, स्वामी स्वरूपानंद नगरचे नाना जाधव, विजय पाटोळे, अरुण पाटोळे, विद्याधर पाटोळे, एस. व्ही. कदम, नामदेवनगर येथील चव्हाण आदी उपस्थित होते.
आचारसंहिता लागू होण्यापूर्वी कामे मार्गी लावण्यासाठी येथील नगरसेवक आणि नागरिक यांनी एकत्रित बसून ही विकासकामे मार्गी लावली जातील. लांजा शहराचा बदल घडवण्याचा प्रयत्न असून पाणी, गटारे, रस्ते, स्ट्रीट लाईट या सर्व सोयी-सुविधा प्राधान्याने मार्गी लावा, अशी सूचना किरण सामंत यांनी नगराध्यक्ष मनोहर वाईत आणि नगरसेवक यांना केल्या. किरण सामंत यांचा यावेळी स्वामी स्वरुपानंदनगर, नामदेवनगर नागरिक यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. नागरिकांनी विकासकामांबाबतचे निवेदन यावेळी किरण सामंत यांना सादर केले.
विकासासाठी कटिबद्ध
किरण सामंत बोलताना पुढे म्हणाले, तुमची कामे करणे ही माझी जबाबदारी असून, माझ्यावर विश्वास ठेवून बघा. विकासाने परिपूर्ण झालेले नवे लांजा शहर तुमच्याप्रमाणे मलाही पाहायचे असून, त्यासाठी मी कटिबद्ध आहे. मी राजकाणावर भर न देता जनसेवेवर भर देत असल्याचा विश्वास किरण सामंत यांनी दिला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:09 AM 28/Sep/2024