रत्नागिरी : कामगारांच्या फसवणूकप्रकरणी संशयिताच्या मुसक्या आवळल्या

रत्नागिरी : शासनाच्या कार्यालयाचा भाग असल्याचे भासवून कामगारांकडून एक हजार ते दीड हजार उकळून फसवणूक करणाऱ्या संशयिताच्या शहर पोलिसांनी रत्नागिरीतूनच मुसक्या आवळल्या.

फसवणुकीची ही घटना ऑगस्ट २०२४ ते २४ सप्टेंबर २०२४ या कालावधीत शिवाजीनगर येथे घडली होती. नरेंद्र करंजूसकर (रा. इस्लामपूर, ता. वाळवा, जि. सांगली) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याने ऑगस्ट ते सप्टेंबर २०२४ या कालावधीत शिवाजीनगर येथील शिवरुद्र प्राईड इमारतीमध्ये स्वतःचे खासगी कार्यालय सुरू करून महाराष्ट्र शासनाकडून बांधकाम कामगारांसाठी असलेल्या योजनेसाठी कामगारांना शासनाच्या कार्यालयाचा भाग असल्याचे भासवले. त्यानंतर कामगारांकडून नोंदणी, नूतनीकरण, यासाठी १ रुपया फी असतानाही साधारपणे १ हजार ते १ हजार ५०० रुपये देण्यासाठी प्रवृत्त करत त्यांची फसवणूक केली होती

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:59 28-09-2024