कोकणवासीयांनी न्याय हक्कासाठी झगडावे : नीलेश राणे

रत्नागिरी : पर्यटन हा फक्त चर्चा करण्यापुरता विषय नाही तर तो गांभीयनि घेण्याचा विषय असून कोकणवासीयांनी यासाठी एकजुटीने आपल्या हक्कासाठी झगडले पाहिजे, असे प्रतिपादन भाजप नेते नीलेश राणे यांनी केले.

रत्नागिरी पर्यटन सहकारी सेवा संस्थेने पर्यटन दिनानिमित्त आयोजित केलेल्या रत्नागिरी पर्यटन परिषदेवेळी ते बोलत होते. या वेळी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष उदय बने, ग्लोबल कोकणचे संचालक संजय यादवराव, संतोष कामतेकर, पर्यटन संस्थेचे संचालक राजू भाटलेकर, इन्फिगो आयकेअर सेंटरचे संचालक डॉ. श्रीधर ठाकूर, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे व्यवस्थापक नाचणकर आदी उपस्थित होते. या वेळी राणे म्हणाले, केवळ रस्ते, हॉटेल्स म्हणजे पर्यटन नाही तर पर्यटन ही एक पॉलिसी आहे.

तो फावल्या वेळेचा विषय नाही तर पूर्णवेळ व्यवसाय आहे. त्यासाठी प्रत्येक व्यावसायिकांनी ही गोष्ट गांभीयनि घेतली पाहिजे. तशीच ती सरकारनेही घेतली पाहिजे. गोव्यात पर्यटनासाठी स्वतंत्र बजेट असते मग आपल्याकडे सुद्धा तितक्याच गांभीयनि याकडे पाहिले पाहिजे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:00 PM 28/Sep/2024