खेड : कष्टकरी कामगारांच्या न्यायहक्कांसाठी लढणाऱ्या राष्ट्रीय कामगार संघटनेच्या कोकण विभाग उपाध्यक्षपदी कष्टकरी आणि कामगार चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते सुदीप शिबे यांची निवड करण्यात आली आहे. राष्ट्रीय कामगार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अशोक जाधव यांनी ही निवड जाहीर केली. शिबे हे गेल्या अनेक वर्षांपासून कष्टकरी, शेतकरी, शेतमजूर आणि वाड्या, तांड्यावर जीवन जगणाऱ्या कामगारांसाठी काम करतात. त्यांच्या या कार्याची संघटनेने दखल घेतली असून, त्यांच्यावर २०२४-२७ या कालावधीकरिता कोकण विभागाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:05 PM 28/Sep/2024