रत्नागिरी : आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी केलेल्या तसेच राज्याचे नाव उज्वल केलेल्या महाराष्ट्रातील पदकप्राप्त खेळाडू व त्यांच्या मार्गदर्शकांना रोख पारितोषिक म्हणून मंजूर करण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे. खो-खोतील १० – आंतरराष्ट्रीय खेळाडूंमध्ये रत्नागिरीतील एका खेळाडूचा समावेश आहे. सुवर्णपदक विजेत्या या खेळाडूंना प्रत्येकी सात लाख व प्रशिक्षकांना १ लाख ८७ हजार ५०० रुपयांचे पारितोषिक मिळणार आहे.
पारितोषिक प्राप्त खेळाडू व प्रशिक्षकांचे महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, सरचिटणीस प्रा. डॉ. चंद्रजित जाधव, कार्याध्यक्ष सचिन गोडबोले, खजिनदार अॅड. गोविंद शर्मा यांनी अभिनंदन केले आहे. पारितोषिक प्राप्त खो-खो खेळाडूंमध्ये अरुण गुणकी (सांगली), अमित पाटील, अवधूत पाटील (दोघे कोल्हापूर), सुयश गरगटे, अक्षय गणपुले (दोघे पुणे), अनिकेत पोटे (मुंबई), अक्षय भांगरे (मुंबई उपनगर), अपेक्षा सुतार (रत्नागिरी), गौरी शिंदे, निकिता पवार (दोघी धाराशिव) यांचा समावेश आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:02 PM 28/Sep/2024