रत्नागिरी : शहरातील आरोग्य मंदिर येथे भर दिवसा घर फोडून अज्ञाताने रोख रकमेसह 8 लाख रुपयांचा मुद्देमाल लांबवला. घरफोडीची ही घटना शनिवार, दि. 21 डिसेंबर रोजी दुपारी 2.30 ते सायंकाळी 4.30 वाजण्याच्या कालावधीत घडली आहे.
याबाबत पार्थ प्रसन्न आंबुलकर (रा. आरोग्य मंदिर, रत्नागिरी) यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, शनिवारी दुपारी पार्थ आंबुलकर हे पत्न्ाी आणि आईसह कपडे खरेदी करण्यासाठी बाजारपेेठेत गेले होते. खरेदी करून झाल्यानंतर ते सायंकाळी 4.30 वाजण्याच्या सुमारास घरी परतले, तेव्हा त्यांना त्यांच्या वडिलांच्या बेडरुममधील लाकडी कपाटातील रोख 7 लाख 50 हजार, चांदीची 100 ग्रॅम वजनाची दोन नाणी व 10 गॅ्रम सोन्याचे वळे असा मुद्देमाल चोरीस गेल्याचे निदर्शनास आले. घराच्या स्वयंपाक खोलीच्या लाकडी दरवाजाच्या आतील बाजूची वरील कडी व ती अडकविण्याच्या खालील बाजूचा लाकडी कोयंडा तोडून घरात शिरुन चोरट्याने ही चोरी केली आहे. या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात भारतीय न्याय संहिता अधिनियम 2023 चे कलम 305,331 (1) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:46 23-12-2024














