रत्नागिरी : जिल्ह्यात सहा महिन्यांत १,४०९ जणांना कुत्र्याचा चावा

रत्नागिरी : जिल्ह्यात सध्या मोकाट जनावरांच्या पाठोपाठ भटक्या कुत्र्यांचाही त्रास वाढला आहे. या कुत्र्यांनी रस्त्यांवर तसेच कॉलनी परिसरामध्ये धुमाकूळ घातला आहे. येथील काही कुत्री पिसाळलेली असून, एप्रिल महिन्यापासून सहा महिन्यांत १ हजार ४०९ जणांचा चावा घेतला आहे. या सर्वाना रेबीजपी लस देण्यात आली आहे. रेबीजबद्दल जनजागृती तसेच काय काळजी घ्यावी यासाठी २८ सप्टेंबर हा दिवस जागतिक रेबीज दिन मागून साजरा केला जातो.

या पार्श्वभूमीवर नुकतीच स्व. शामराव पैजे सभागृह, जि. प. रत्नागिरी येथे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांच्याद्वारे जिल्हातीत सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांना रेबीज आजराबाबत प्रशिक्षण देण्यात आले. सध्या आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी रेबीजची लस मोफत उपलब्ध असून, एप्रिल २०२४ पासून एकूण स्वानदंश झालेल्या १४०९ रुग्णांनी लस घेतली आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांनी दिली. नागरिकांनी रेबीज आजाराबद्दल माहिती घेऊन स्वतः ची काळजी घ्यावी, असे आवाहन केले आहे.

रेबीज हा प्राण्याकडून मानवास होणास (झुनोटिक) विषाणूजन्य आजार असून, हा मध्यवर्ती मज्जासंस्थेवर परिणाम करतो. रेबीज हा आजार कुत्रे, मांजर आणि वन्यप्राण्यांसह सस्तन प्राण्यांत संक्रमित होऊन लाळेद्वारे पसरतो. सामान्यतः चाव्याद्वारे, ओरखडे किला त्वचेच्या थेट संपकर्काद्वारे (उदा. डोळे तोंड किंवा उघड्या जखमा) होती, मानवी रेबीज मृत्युचे बहुसंख्य स्रोत कुत्रे आहेत, जे मानवांना होणाऱ्या सर्व रेबीज संक्रमणांपैकी एक महत्वाचे कारण आहे.

कोणत्याही प्राण्याचा चावा रेबीजकरिता कारणीभूत ठरू शकतो. रेबीजच्या प्राण्याच्या वर्तनामध्ये अचानक बदल होणे,उत्तेजक वर्तन, भ्रम, समन्वयाचा अभाव, हायड्रोफोबिया (पाण्याची भीती) आणि एरोफोबिया (ताजी हवेची भीती) हे बदल आढळतात. कार्डिओ रेस्पिरेटरी अरेस्टमुळे काही दिवसांनी मृत्यू होतो.

कुत्रा चावल्यास काय करावे?
एखाद्या प्राण्याला कुत्रा चावल्यास जखम पूर्णपणे धुवावी. पशुवैद्यकीय दवाखान्यात जाऊन रेबीज लसीचा कोर्स करावा व उपचार करावेत. एखाद्या व्यक्तीला प्राण्याने चावा घेतल्यास किवा ओरबाडले असल्यास, जखमा पूर्णपणे धुवाव्यात व ताबडतोब नजीकच्या शासकीय दवाखान्यात जाऊन डॉक्टरांच्या सल्ल्याने वैद्यकीय उपचार घ्यावेत रेबीज लसीचा कोर्स घ्यावा.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:25 PM 28/Sep/2024