नायरी-पाटण घाट सर्वेक्षणाचे काम सुरू

आरवली : बहुचर्चित असलेल्या आणि संगमेश्वर तालुक्याचे तसेच पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणाला जोडणाऱ्या नायरी-पाटण घाटाच्या सर्वेक्षणासाठी आ. शेखर निकम व तत्कालीन सरकार यांच्या माध्यमातून ५ कोटींचा निधी सर्वेक्षणासाठी मंजूर झाला आहे. घाट सर्वेक्षणाच्या अनुषंगाने ग्रामस्थ व अधिकाऱ्यांनी पाहणी केली.

पुण्यातील एका कंपनीने ठेका घेतला आहे. त्या कंपनीचे प्रतिनिधी परिसरातील नागरिक व बांधकाम खात्यातील प्रतिनिधी यांनी संयुक्तपणे नेरद या सह्याद्रीच्या पायथ्याशी जाऊन सर्वे कशा पद्धतीने करता येईल याची पाहणी केली. यावेळी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र पोमेंडकर सार्वजनिक बांधकाम खात्याचे दीपक इंदुलकर, संतोष सावंत, प्रदीप सोलकर सुजय पाले, महिंद्र होडे, शांताराम भारती, अशोक घाडगे, तानू मालप उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:51 23-12-2024

Shiva optical