रत्नागिरी जि. प. चे नवे सीईओ अण्णासाहेब चव्हाण

रत्नागिरी : जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी अण्णासाहेब दादू चव्हाण यांची नियुक्ती झाली आहे. बदलीच्या प्रक्रियेत सध्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार यांची मात्र बदली झाली आही.

शासनाने शनिवारी राज्यातील अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. यामध्ये पुणे येथील महसूल विभागाचे उपायुक्त असलेल्या अण्णासाहेब चव्हाण यांना रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती देण्यात आली आहे. कीर्तीकिरण पूजार यांनी १ ऑक्टोबर २०२२ रोजी पद्भार हाती घेतला होता. गेल्या दोन वर्षांत त्यांनी या पदाला योग्य न्याय दिला. त्यांच्या कारकिर्दीत पर्यटनमधून महिला बचतगटांना रोजगार मिळवून दिला. त्याचबरोबर राज्यातील पहिला सौरऊर्जा प्रकल्प त्यांच्या कारकिर्दीत झाला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:08 23-12-2024

Khabardar diwali fest