रत्नागिरी : रेल्वे प्रवासादरम्यान प्रवाशाची बॅग लांबवून अज्ञाताने ३० हजार रुपयांचा लॅपटॉप लांबवला. चोरीची ही घटना रविवार १५ डिसेंबर रोजी सकाळी ७.३० वा. सुमारास रत्नागिरी रेल्वे स्टेशन येथे एलटीटी- मडगाव एक्सप्रेसमध्ये घडली होती. याबाबत हेमंतकुमार भास्कर सदगुणे (४७, रा. नवी मुंबई) यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, रविवारी ते एलटीटी मडगाव एक्सप्रेसने प्रवास करत असताना रेल्वे रत्नागिरी रेल्वेस्टेशनवर थांबली असता अज्ञाताने त्यांची बॅग चोरुन नेली. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:47 AM 24/Dec/2024












