रत्नागिरी : विश्वमंगल गोशाळा आणि सोमेश्वर शांतीपीठच्या संस्थापिका अनुजा पेठकर आणि मार्गदर्शक व ट्रस्टी रवींद्र इनामदार यांनी माजी केंद्रीय मंत्री, खासदार नारायण राणे यांची भेट घेतली. राणे यांनी गोशाळेचे कार्य जाणून घेत मदत करण्याचे व एकदा गोशाळेला प्रत्यक्ष भेट देण्याचे आश्वासन दिले.
या भेटीदरम्यान, गोशाळेची स्थिती आणि तिच्या कार्याबद्दल मा. राणे यांना सविस्तर माहिती देण्यात आली. अनुजा पेठकर आणि इनामदार यांनी गोशाळेच्या कामकाजाचे तसेच त्याच्या विस्तारासाठी आवश्यक असलेल्या मदतीचे आवाहन केले. गोशाळेची सेवाभावी कार्यपद्धती आणि समाजाच्या कल्याणासाठी केली जाणारी मेहनत याबद्दल चर्चा करण्यात आली.
या महत्त्वपूर्ण भेटीमुळे दोन्ही संस्थांच्या प्रयत्नांना प्रोत्साहन मिळाले असून, गोशाळेच्या कार्याला अधिक बळ मिळेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:23 PM 24/Dec/2024












