संगमेश्वर : कडवई येथे पी. एम. सूर्यघर योजनेचे प्रबोधन शिबिर

कडवई : पी. एम. सूर्यघर मोफत वीज योजनेचे संगमेश्वर उपविभागाकडून कडवई ग्रामपंचायत येथे प्रबोधन शिबिर घेण्यात आले. यामध्ये पी. एम. सूर्यघर योजनेसह महावितरणच्या इतर अनेक बाबीवर उपकार्यकारी अभियंता फारूक गवंडी यांनी मार्गदर्शन केले. प्रबोधन सत्रात एकूण १५ लोकांनी पहिल्या टप्प्यात नोंदणी केली. शिबिरासाठी तुरळचे शाखा अभियंता वीरेंद्र सपकाळ तुरळचे सर्व जनमित्र तसेच भावे इलेक्ट्रिकलचे सागर भावे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे नियोजन सरपंच विशाखा कोळेकर, उपसरपंच दत्ताराम ओकटे, अंनिस खान यांनी केले होते. योजनेसाठी संगमेश्वर तालुक्यातील महावितरणच्या संगमेश्वर, कसबा, तुरळ, कुरधुंडा, आरवली या शाखेत परिसरातील ग्राहकांनी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:00 PM 28/Sep/2024