रत्नागिरी : मालगुंड भाटलेवाडी येथील श्री महालक्ष्मी मंदिराचा २६ डिसेंबरला रौप्य महोत्सव

गणपतीपुळे : रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड येथील श्री महालक्ष्मी मंदिराला २६ डिसेंबर रोजी पंचवीस वर्ष पूर्ण होत असल्यामुळे रौप्य महोत्सव व मार्गशीर्ष उत्सव श्री महालक्ष्मी मंदिरात साजरा करण्यात येणार आहे.

त्यानिमित्त मालगुंड भाटलेवाडी येथील श्री महालक्ष्मी मित्र मंडळ आणि श्री महालक्ष्मी महिला मंडळ यांचे संयुक्त विद्यमाने विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. २६ रोजी महालक्ष्मी देवीचा स. ९ वा. अभिषेक, देवीची महाआरती, दु. १२ ते ३ महाप्रसाद व हळदी-कुंकू कार्यक्रम, रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आणि मार्गशीर्ष उत्सवानिमित्त २६ रोजी सायं. भजन, गरबा आणि हौशी ‘कलाकार नमन मंडळ गोळवली संगमेश्वर यांचे बहुरंगी नमन सादर होणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:20 PM 24/Dec/2024