चिपळुणात २८, २९ डिसेंबर रोजी स्पर्धा परीक्षेबाबत मोफत मार्गदर्शन

चिपळूण : चिपळूण तालुक्यातील मार्गताम्हाने, खडपोली व सावर्डे येथे दि. २८ व २९ डिसेंबर रोजी मोफत शासकीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी मुंबई सीमा शुल्क विभागाचे अनुवाद अधिकारी (भारत सरकार) सत्यवान रेडकर उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.

२८ डिसेंबरला सकाळी ९ वा. कमलाबाई वामन पेठे कनिष्ठ महाविद्यालय, मार्गताम्हाणे. दु. १२ वाजता छत्रपती शिवाजी महाराज सभागृह, ग्रामपंचायत खडपोली तर २९ डिसेंबर सकाळी १०:३० वाजता कला व वाणिज्य महाविद्यालय सभागृह, सावर्डे येथे व्याख्यान होणार आहे. आपल्या महाराष्ट्रातील व्यक्तींना रोजगाराच्या अनुषंगाने संधीचा लाभ घेता यावा व जास्तीत जास्त महाराष्ट्रातील व्यक्तींचे विविध पदांवर निवड होण्यासाठी उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:28 PM 24/Dec/2024

Khabardar diwali fest