खेड : कोकण रेल्वेमार्गावर नाताळसह नववर्षाच्या स्वागतासाठी सुरू झालेल्या जादा गाड्यांसह नियमित गाड्यांना प्रचंड गर्दी झाली आहे. अनेकांना उभ्याने प्रवास करावा लागत असल्यामुळे प्रवाशांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. सीएसएमटी करमाळी स्पेशल गाडी पहिल्याच दिवशी चार तास उशिराने धावल्यामुळे कोकणासह गोव्याकडे जाणाऱ्या पर्यटकांची पंचाईत झाली होती.
नाताळसह नववर्ष स्वागतासाठी गोव्याला जाणाऱ्या पर्यटकांमुळे कोकण मार्गावरून धावणाऱ्या नियमित गाड्यांसह हिवाळी स्पेशल गाड्या फुल्ल झाल्या आहेत. कोकण मार्गावर केवळ चार हिवाळी स्पेशल गाड्या जाहीर करण्यात आल्या होत्या. बुधवारी (ता. २५) नाताळ असल्यामुळे पर्यटकांची दोन दिवस आधीपासून लगबग सुरू झाली होती. विकेंडमुळे नियमित गाड्या हाऊसफुल्ल धावत असून, हिवाळी स्पेशल गाड्यांचेही आरक्षण फुल्ल झाले. २९ डिसेंबरपर्यंतच्या धावणाऱ्या रेल्वेगाड्यांसह हिवाळी स्पेशल गाड्यांना गदीं होणार आहे. सीएसएमटी-करमाळी स्पेशलला पहिल्याच दिवशी चा उशिराने धावली. त्यामुळे ५ गाड्यांवरह परिणाम झाला आहे.
‘एलटीटी-करमळी’च्या १८ जादा फेऱ्या
ख्रिसमससह नववर्ष स्वागतासाठी एलटीटी-करमळी या गाडीच्या १८ जादा फेऱ्यांचे नियोजन केले आहे. या फेऱ्या ३१ डिसेंबरपर्यंत धावणार आहेत. यापूर्वी सीएसएमटी-करमळी साप्ताहिक गाड्या जाहार करण्यात आल्या आहेत. त्यात एलटीटी-करमळी स्पेशलच्या अधिक फेऱ्यांची भर पडल्यामुळे एकूण फेऱ्यांची संख्या ६६ वर पोहोचली आहे. त्यामुळे पर्यटक सुखावले आहेत. ही स्पेशल गाजी २३ पासून नियमित धावणार आहे. एलटीटीहून सायंकाळी ३.३० वा. सुटून दुसऱ्या दिवशी पहाटे ५.३० वा. करमळी येथे पोहोचेल. परतीच्या प्रवासात २४ डिसेंबर ते १ जानेवारीपर्यंत धावणारी स्पेशल करमळी येथून सकाळी ६.४५ वा. सुटून त्याचदिवशी रात्री १०.१५ वा. एलटीटीला पोहोचेल.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:28 AM 25/Dec/2024














