चिपळूण : संस्कार भारती या कलाक्षेत्रात काम करणाऱ्या अग्रगण्य संस्थेच्या उत्तर रत्नागिरी जिल्हा समितीतर्फे बुधवार, दि. २५ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वा. पुण्यश्लोक श्रीमती अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त त्यांच्या जीवनप्रवासावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.
बोरिवली येथील संस्कारभारतीचे रविराज पराडकर हे अहिल्याबाई होळकर यांच्या जीवनावरील व्याख्यानपुष्प गुंफणार आहेत. कार्यक्रमाचा आस्वाद घेण्यासाठी सर्व रसिक श्रोत्यांनी या कार्यक्रमाला बहुसंख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संस्कार भारती उत्तर रत्नागिरी महामंत्री मंगेश बापट आणि अध्यक्ष शरद तांबे यांनी केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:56 AM 25/Dec/2024













