पणजी : गोव्यात नाताळचा सण आणि नव्या वर्षाची जोरदार तयारी सुरू झाली आहे. नाताळचा सण आणि नव्या वर्षाचा सण साजरा करण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे गोवा यंदा हॉटेल्समध्ये बुकिंग सुरू झाली आहे.
२५ डिसेंबरला जगभरात नाताळ साजरा केला जातो. भगवान येशू ख्रिस्त यांच्या जन्मसोहळ्याची महिन्याच्या सुरुवातीपासूनच तयारी सुरू झाली आहे. यानिमित्त राजधानी पणजीसह राज्यातील बाजारपेठांमध्ये ख्रिसमसचे साहित्य दाखल झाले असून खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी होत आहे.
संपूर्ण जगभरामध्ये सध्या सुट्ट्यांचा माहोल सुरू असून अनेकांचे बेत सुरू आहेत ते म्हणजे बहुविध ठिकाणांना भेट देण्याचे. तर काही मंडळी मात्र ठरलेल्या ठिकाणांनाच पसंती देत तिथे निवांत क्षण व्यतीत करण्यासाठी निघाले आहेत. अशा सवयीच्या ठिकाणांमध्ये येणारं एक नाव म्हणजे गोवा.
वर्षाचा शेवट, नाताळ सण आणि गोव्याच सुशेगाद आयुष्य अनुभवण्यासाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही गोव्याच्या दिशेने अनेकांची पावले वळत आहेत. सध्या गोव्यात येणारे
पर्यटक, हॉटेल्समध्ये झालेले बुकिंग हा एकंदर आकडा पाहता, येत्या काही दिवसांमध्ये राज्यात विक्रमी गर्दी पाहायला मिळणार आहे. ज्यामध्ये येथील हॉटेल्स, रिसॉर्ट, कॉटेज, होमस्टे असे अनेक पर्याय हाऊसफुल्ल झाले आहेत. नाताळचे ख्रिसमस ट्री हे विशेष आकर्षण असते. बाजारात विविध आकार, उंचीत ट्री उपलब्ध असून त्यानुसार त्याच्या किमती आहेत. ४ फुटाच्या ट्री ची किंमत ६ हजारपासून सुरू आहे, ते पुढे १५ फुटाची ट्री ५० ते ६० हजारांचा विक्रीस उपलब्ध आहे. ट्री ला लावण्यासाठीच्या रंगीबेरंगी माळा २०० पासून ते १००० रुपयांना उपलब्ध आहेत. नाताळनिमित्त केकलाही मोठी मागणी असते. त्यामुळे केकच्या ऑर्डर्स देण्यात आल्यामुळे सध्या केक शॉप्सनाही सुगीचे दिवस आहेत. वेगवेगळ्या चवीचे, आकाराचे केक तयार केले जात आहेत. गोव्यात नाताळ हा दिवाळी सणाप्रमाणेच साजरा केला जातो. प्रत्येक ख्रिस्ती बांधवाच्या घरात आनंदोत्सव साजरा केला जातो. छोट्या मुलांना तर नाताळ म्हणजे पर्वणीच आहे.
घरांवर रोषणाई
ख्रिसमस मध्ये घरांवर आजूबाजूला सर्वत्र विद्युत रोषणाई, चांदण्या लावल्या जातात. विविधरंगी, वेगवेगळ्या डिझाईन्सचे आकाशकंदील आणि विद्युत दिवे, आकर्षक विद्युत रोषणाईही पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे.
येशू जन्माचा देखावा
ख्रिसमसमध्ये जागोजागी येशू जन्माचा देखावा तयार केला जातो. यामध्ये गोठ्याची प्रतिकृती उभारली जाते. देखावा तयार करण्यासाठी लागणारे बांबू, गवत, छोटे-छोटे मारिया, जोसेफ, येशुबाळ, देवदूत आदीच्या मूर्ती बाजारात विक्रीसाठी असून साहित्य खरेदीसाठी गर्दी होत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:57 PM 25/Dec/2024














