संगमेश्वर, गुहागर व रत्नागिरी तालुक्यातील दळणवळण होणार सुटसुटीत; ३० किलोमीटरचे अंतर कमी होणार असल्याने नागरिकांची गैरसोय टळणार
माखजन : Karjuve Bhatgaon Bridge Construction Ratnagiri संदर्भात रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर, गुहागर आणि रत्नागिरी या तीन तालुक्यांच्या दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या ठरणाऱ्या करजुवे-तिसंग ते भातगाव दरम्यानच्या प्रस्तावित मोठ्या पुलाच्या बांधकामाची प्रक्रिया आता गतिमान झाली आहे. या प्रकल्पाच्या उर्वरित ३६ कोटी रुपयांच्या निधीसाठी आमदार शेखर निकम यांनी शासनस्तरावर जोरदार पाठपुरावा सुरू केला आहे.
या संदर्भात आ. शेखर निकम यांनी नुकतीच सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांची भेट घेऊन निवेदन सादर केले होते. त्यावर मंत्र्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अप्पर मुख्य सचिवांना उचित कार्यवाही करण्याचे निर्देश दिल्याने या प्रकल्पाच्या हालचालींना मोठा वेग आला आहे.
प्रकल्पाची पार्श्वभूमी आणि अंदाजपत्रक
आरवली-माखजन-करजुवे-डिंगणी-संगमेश्वर या रस्त्यावरील गदनदीवर हा पूल प्रस्तावित आहे. फेब्रुवारी २०२२ च्या अर्थसंकल्पात या पुलासाठी २३ कोटी रुपयांच्या रकमेस प्रशासकीय मान्यता मिळाली होती. मात्र, सुमारे ३०० मीटर लांबीचा हा भव्य पूल, वेल फाउंडेशन, नेव्हिगेशन स्पॅन आणि सुमारे ९३० मीटर लांबीचे जोडरस्ते यांसह या संपूर्ण प्रकल्पासाठी अंदाजे ६० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

यामध्ये पुलाच्या बांधकामासाठी ५३ कोटी २० लाख रुपये, तर भूमीस्वाधीनारासाठी (भूसंपादनासाठी) सुमारे ६ कोटी ८० लाख रुपये लागणार आहेत. त्यामुळे उर्वरित ३६ कोटी रुपयांची तरतूद आगामी हिवाळी अधिवेशनाच्या अर्थसंकल्पात करण्यात यावी, अशी ठाम मागणी आ. निकम यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांकडे केली आहे.
गदनदीवरील पुलामुळे दळणवळण सुलभ आणि वेळेची बचत
गदनदीवर पूल नसल्यामुळे संगमेश्वर, गुहागर व रत्नागिरी या तिन्ही तालुक्यांतील खाडीकिनारी असलेल्या गावांचा संपर्क अत्यंत खटला व दुष्कर बनला होता. पूर्वी सुरू असलेली फेरीबोट सेवाही बंद असल्याने ग्रामस्थांना मोठा वळसा घालून प्रवास करावा लागतो.
अंतरात मोठी कपात: या प्रस्तावित पुलामुळे संगमेश्वर व गुहागर तालुक्यांमधील अंतर तब्बल ३० किलोमीटरने कमी होणार असून प्रवासाची वेळ व खर्चाची मोठी बचत होणार आहे.
पर्यटन व व्यवसायाला चालना: गणपतीपुळे व गुहागर या प्रमुख पर्यटनस्थळांना जोडणारा हा मार्ग अधिक सुलभ होणार असल्याने स्थानिर्क पर्यटन वाढीस लागेल. तसेच कोकणातील आंबा, काजू व मत्स्य व्यवसायाची वाहतूक वेगाने होऊन परिसराच्या आर्थिक विकासाला मोठी चालना मिळणार आहे.













