ना. उदय सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त पावस येथील आनंदी अनुसया महिलाश्रमाला इन्व्हर्टर भेट

पावस : उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पावस येथील आनंदी अनुसया महिलाश्रमामध्ये शिवसेना पावस विभागप्रमुख विजय चव्हाण यांच्या हस्ते इन्व्हर्टर भेट दिला. दरवर्षी आमदार सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे कार्यकर्ते कबड्डी, क्रिकेट स्पर्धा, रक्तदान शिबिरे घेतात. मात्र पावस शिवसेना विभागातर्फे यावर्षी सामाजिक उपक्रम राबविण्याच्या दृष्टीने पावस येथील आनंदी अनुसया महिलाश्रमामध्ये इन्व्हर्टर देण्याचे निश्चित केले. हा महिलाश्रम अनेकांच्या देणगीदारांच्या माध्यमातून चालवला जात आहे. त्यामुळेच अनेक वृद्ध महिलांना या ठिकाणी राहिल्यानंतर त्यांच्या उर्वरित आयुष्यासाठी नवसंजीवनी मिळते.

या महिलांच्या सुखसोयीसाठी अनेकजण मदतीचे हात पुढे करतात. हाच धागा पकडून शिवसेना पावस विभागप्रमुख विजय चव्हाण यांनी स्पर्धा भरवण्यापेक्षा या महिलाश्रमाला इन्व्हर्टर देण्याचा निर्णय घेतला. विशेष करून पावसाळ्यामध्ये वारंवार वीजपुरवठा खंडित होतो. या इन्व्हर्टरमुळे हा त्रास वाचणार आहे.

या संदर्भात विभागप्रमुख विजय चव्हाण म्हणाले, वाढदिवसाचे औचित्य साधून अनेक सामाजिक कार्यक्रम केले जातात. गावच्या विकासाच्या दृष्टीने विकासकामे केली जातात. मात्र अशा सामाजिक संस्थांना मदतीची गरज असते. ही बाब लक्षात ठेवून त्या संस्थांमध्ये त्यांना आवश्यक असलेल्या वस्तू भेट देणे गरजेचे असते. त्यामुळेच पावसमधील महिलाश्रमासाठी इन्व्हर्टर देण्याचे ठरवले.
या वेळी लाईक फोंडू, शुभदा नार्वेकर, स्मिता भिवंडी, महेश साखळकर, राजू मिस्त्री, जितेंद्र शिरसेकर, कीर्ती पटवर्धन, अकल्पिता चक्रदेव, राधा फडके आदी उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:16 PM 26/Dec/2024