राजापूर : जैतापूर परिसरातील गावांमधील लोकांच्या संपर्कासाठी जैतापूर येथे एसटी मिनीडेपोची उभारणी व्हावी, अशी गेल्या कित्येक वर्षांपासून मागणी केली जात आहे. त्यासाठी आवश्यक असलेली तीन गुंठे जागाही जैतापूर ग्रामपंचायतीने उपलब्ध करून दिली आहे. मात्र, जागा उपलब्ध असूनही एसटी डेपोची मागणी आणि प्रत्यक्ष उभारणी लालफितीच्या कारभारात रखडली आहे. त्याबाबत ग्रामपंचायत सदस्य दिवाकर आडविरकर यांच्यासह ग्रामस्थांसह प्रवाशांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
जैतापूर येथील प्रस्तावित मिनी एसटी बसस्थानकाच्या मागणीबाबत ग्रामपंचायत सदस्य दिवाकर आडविरकर, शिवसेनेचे शास्त्राप्रमुख संदीप शिवलकर, जैतापूर एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्थ आशिष मांजरेकर यांनी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने महाव्यवस्थापक दिनेश महाजन यांगों भेट घेतली. यावेळी प्रस्तावित असलेला जैतापूर येथील मिनी डेपोची मंजूरीसह उभारणी मार्गी लावण्याची मागणी केली. एसटीची पिकअपशेड, चालक-वाहकांसाठी विश्रांती कक्ष, कंट्रोल रूम, प्रवाशांसाठी स्वच्छतागृह, पेपर स्टॉल, कॅन्टीन आदी सुविधांच्या उभारणीसाठी आवश्यक तीन गुंठे जागाही ग्रामपंचायतीने उपलब्ध करून देण्याचे निश्चित केले आहे. तरीही एसटी विभागाकडून या मिनी डेपोच्या उभारणीसाठी फारशी उत्सुकता दाखविली जाताना दिसत नाही, त्यामुळे प्रवाशांसह ग्रामस्थांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:31 AM 27/Dec/2024












