चिपळूण : पोफळीत भटक्या कुत्र्यांची दहशत

चिपळूण : पोफळी गावात भटक्या कुत्र्यांची दहशत वाढली आहे. अनेक ठिकाणी या कुत्र्यांनी चिमुकल्यांसह परिसरातील नागरिकांवर हल्ला केल्याचे प्रकार पुढे येत आहेत. या परिसरातील एका कुत्र्याने एका बैलासह २५ जणांना चावा घेतल्याचे पुढे आले आहे.

पोफळी गावात भटक्या कुत्र्यांचा त्रास होत असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. येथील महानिर्मिती कंपनीची वसाहत आहे. या वसाहतीसह गावातील वाड्यांमध्ये पिसाळलेल्या कुत्र्याने तब्बल २५ जणांचा चावा घेतल्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकाराने नागरिकांचे घराबाहेर पडणे मुश्कील झाले असून, ग्रामपंचायतीने भटक्या कुत्र्यांची संख्या नियंत्रित करण्यासाठी, अशी मागणी नागरिक करत आहेत. पोफळी मार्केट, पोफळी नाका, सल्फरेवाडी, मुरली वाडी या परिसरात नागरिक अक्षरशा जीव मुठीत घेऊन फिरत आहेत. या कुल्याने तीन वर्षाच्या चिमुकलीसह ७० वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकांपर्यंत नागरिकांना चावा घेतला आहे. सर्व जखमींवर शिरगाव प्राथमिक आरोग्य केंद्र आणि कामथे उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले. एका पिसाळलेल्या कुत्र्याने बैलाचा चावा घेतला. त्याच्यावर चिपळूण येथील पशुवैद्यकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले. पोफळी गावात कुत्र्यांची संख्या बाहली आहे. यातील अनेक कुत्री पिसाळली आहेत. या परिसरामधून फिरणे नागरिकांना प्रचंड त्रास होत आहे. याकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे.

जणांना कुत्र्यांनी
पोफळी गावात कुत्र्यांची दहशत प्रचंड मोठी आहे. आता पर्यंत २५ चावा घेतला आहे. या कुत्र्यांचा बंदोबस्त केला पाहिजे. जिल्हा परिषदेने त्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. निर्वाजीकरण हा एकमेव पर्याय आहे. –मुफिल सय्यद, पोफळी

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:26 PM 27/Dec/2024