सावर्डे : गोविंदराव निकम विद्यालयाने राबविले स्वच्छता अभियान

सावर्डे : संत गाडगेबाबा पुण्यतिथीचे औचित्य साधून सह्याद्री शिक्षण संस्था संचलित गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाने स्वच्छता अभियानांतर्गत गांधी तीर्थ जळगाव यांच्या प्रेरणेने शाळेचा परिसर व सावर्डे परिसरात स्वच्छता मोहीम राबवली. स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून श्रमदानाचे धडे प्रत्यक्ष सहभागातून विद्यार्थ्यांना प्राप्त होतात. या अभियानामध्ये इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला व उत्स्फूर्तपणे सावर्डे सहाण, मशीद व हायवेच्या परिसरातील संपूर्ण भाग स्वच्छ करून ओला व सुका कचरा वेगळा करून सेंद्रीय खत निर्मितीसाठी त्याचा उपयोग केला. सामाजिक बांधिलकी म्हणून विद्यालयाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमाचे सावर्डे परिसरातील नागरिक पालक यांच्याकडून कौतुक होत आहे. विद्यार्थ्यांची प्राचार्य राजेंद्र वारे उपप्राचार्य विजय चव्हाण, पर्यवेक्षक उध्दव तोडकर यांनी विद्यार्थ्यांची अभिनंदन केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:43 PM 27/Dec/2024

Shanti 4