कुवारबाव येथे एसटीला दुचाकीची धडक; स्वारावर गुन्हा

रत्नागिरी : रत्नागिरी-हातखंबा रस्त्यावरील कुवारबाव येथे एसटीला धडक देणाऱ्या दुचाकीचालकाविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. अपघाताची घटना २४ सप्टेंबर २०२४ रोजी रात्री ८.३०च्या सुमारास घडली होती. संतोष तातोबा माने (३९, रा. उत्कर्षनगर कुवारबाव, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष माने हा २४ सप्टेंबर रोजी रात्री ८.३० च्या सुमारास दुचाकी (एमएच ०८ बीएफ ०७९८) घेवून कुवारबाव येथून जात होता. यावेळी राजापूर-रत्नागिरी व्हाया ओणी बस (एमएच २० बीएल २११७) ही रत्नागिरीच्या दिशेने येत असताना कुवारबाव येथे संतोषने दुचाकीने समोरुन जोराची धडक दिली. यात दुचाकीसह संतोष मानेला दुखापत झाली. तसेच बसच्या समोरील भागाचेही नुकसान झाले. या प्रकरणी पोलिसांनी निष्काळजीपणे वाहन चालवल्याचा ठपका ठेवत गुन्हा दाखल केला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:08 28-09-2024