राज्यात वादळी पावसाचा इशारा

पुणे : राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाच्या सरींनी हजेरी लावली आहे. अनेक ठिकाणी सकाळपासूनच ढगाळ वातावरण असून, किमान तापमानात वाढ झाल्याने थंडी गायब झाली आहे. आज (ता. २८) राज्यात वादळी वारे, विजांसह पावसाची शक्यता असल्याचा इशारा (ऑरेंज अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.

दक्षिण केरळ लगतच्या अरबी समुद्रात समुद्र सपाटीपासून ३.१ किलोमीटर उंचीपर्यंत चक्राकार वाऱ्यांची स्थिती सक्रिय आहे. उत्तर भारतातील राज्यांमध्ये थंडीचा कडाका कमी-अधिक होत आहे. शुक्रवारी (ता. २७) राजस्थानच्या ‘चुरू’ येथे देशाच्या सपाट भूभागावर नीचांकी ५.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. राज्यातही थंडी गायब झाली असून शुक्रवारी धुळे येथील कृषी महाविद्यालयात नीचांकी १३.५ अंश तापमान नोंदले गेले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:15 28-12-2024

Kore Mobile