पुणे : पश्चिम बंगालमध्ये कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने राज्यात मान्सूनचे वारे किंचित सक्रिय झाले आहेत. त्यामुळे १७ सप्टेंबर रोजी राज्यात सर्वत्र हलका ते मध्यम पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.
राज्यातून मोठा पाऊस कमी झाला आहे. हवेचे दाबही गेले काही दिवस वाढल्यामुळे मान्सून कमजोर झाला आहे. मात्र गेल्या २४ तासांपासून पश्चिम बंगालमध्ये कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे राज्यात १७ ते २० सप्टेबरपर्यंत हलक्या पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. २१ सप्टेंबर रोजी जळगावसह परभणी, नांदेड, हिंगोली आणि जालना या शहरांना मुसळधार पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. २२ सप्टेंबरपासून राज्यात पाऊस वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:53 17-09-2024