कारने दिलेल्या धडकेत कुर्धेफाटा येथे बैल ठार

पावस : मोटारीसमोर अचानक बैल आल्याने त्याला ठोकर बसून तो जागीच ठार झाला. सागरी मार्गावरील पूर्णगड ते पावस मार्गावरील कुर्धेफाटादरम्यान हा अपघात झाला. यामध्ये मोटारीचेही नुकसान झाले आहे. पुन्हा एकदा मोकाट जनावरांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

रत्नागिरी ते पावसमार्गे पूर्णगड या सागरी मार्गावर मोकाट जनावरांचा मोठ्या प्रमाणात वावर सुरू आहे. अनेक शेतकरी आपली जनावरे न पाळता उनाड सोडतात. त्याकडे कोणत्याही परिस्थितीमध्ये लक्ष दिले जात नाही व त्या जनावरांच्या शोधासाठी संबंधित कोणताही मालक रस्त्यावर शोधण्यासाठी व घरी नेण्यासाठी येत नाही. त्यामुळे ही जनावरे रस्त्याचा आश्रय घेत आहेत. या मोकाट गुरांमुळे दिवसेंदिवस अपघाताचे प्रमाण वाढत आहे. तसाच प्रकार काल रात्री कुर्धेफाटा येथे कारचालकाच्या समोर अचानक बैल आडवा आला. त्यामुळे त्याचे गाडीवरील नियंत्रण राहिले नाही. गाडीने बैलाला ठोकर दिल्याने बैल जागीच ठार झाला; मात्र मोटार चालकाला कोणतीही इजा झाली नाही; मात्र गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:49 AM 30/Sep/2024