मिरकरवाडा बंदरात खलाशाचा मृतदेह

रत्नागिरी : मिरकरवाडा येथील बोटीवर खलाशी म्हणून काम करणाऱ्या तरुणाचा मृतदेह समुद्राच्या पाण्यात आढळून आला. ही घटना शनिवारी २८ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५.५५ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली.

यज्ञ बहादर डंगौरा (३५, रा. बावनिया, नेपाळ. सध्या रा. मिरकरवाडा, रत्नागिरी) असे समुद्रात बुडून मृत्यू ओढवलेल्या नेपाळी खलाशाचे नाव आहे. तो खबर देणार यांच्या मालकीच्या अलिमिया नावाच्या मासेमारी बोटीवर म्हणून कामाला होता. गुरुवार, २६ सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास तो बोटीवरील अन्य खलाशांना काहीही न सांगता निघून गेला होता. त्याला दारूचे व्यसन असल्यामुळे त्याचे सहकारी त्याचा सर्वत्र शोध घेत होते. यादरम्यान, शनिवारी सायंकाळी ५.५५ वा. मिरकरवाडा येथील समीना जेटीजवळील पाण्यात त्याचा मृतदेह दिसून आला. शहर पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:47 30-09-2024