पक्षात कुणाचाही अनावश्यक हस्तक्षेप सहन करणार नाही : सुनेत्रा पवार

मुंबई : पक्षात शिस्तभंग, गटबाजी किंवा पक्षप्रतिमा मलिन करणाऱ्या कोणत्याही प्रकाराला थारा दिला जाणार नाही. पक्षात कुणाचाही अनावश्यक हस्तक्षेप सहन करणार नाही. काहीजण पक्षात राहूनच पक्षाला वेठीस धरण्याचा प्रयत्न करत असतील तर ते सहन केले जाणार नाही.

कठोर निर्णय घेण्यास मागेपुढे पाहणार नाही, असा इशारा अजित पवार गटाच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिला.

पक्षाच्या २७ व्या वर्धापन दिनानिमित्त गुरुवारी मुंबईत आयोजित मेळाव्यात त्या बोलत होत्या. यावेळी राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, राष्ट्रीय सरचिटणीस पार्थ पवार, ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील, मंत्री छगन भुजबळ आदीसह पक्षाचे सर्व मंत्री, आमदार, खासदार, पदाधिकारी उपस्थित होते.

नेत्यांनी पक्षवाढीसाठी काय योगदान दिले हे अधिक महत्त्वाचे आहे. मंत्र्यांच्या कामाचे तसेच पदाधिकाऱ्यांचे त्रयस्थ मूल्यमापन केले जाईल. प्रभावी काम करणाऱ्यांनाच संधी दिली जाईल.
सुनेत्रा पवार, उपमुख्यमंत्री, राष्ट्रीय अध्यक्षा, अजित पवार गट

२००४ साली संख्याबळाच्या आधारे राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री झाला असता, असे सुनील तटकरे म्हणाले. तटकरेंनी भाषणात छगन भुजबळ यांचा कबड्डीपटू असा उल्लेख केला. तो धागा पकडत भुजबळ म्हणाले की, खेळात राजकारण आणू नका, राजकारणाचा खेळ करू नका, पक्षापेक्षा कोण मोठा नाही.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:38 12-06-2026