संगमेश्वर : ओझरे गणेशबाग येथे लागलेल्या वणव्यात जलजीवनचे पाईप जळून खाक

साडवली : देवरुख नजीकच्या ओझरे गणेशबाग येथे मंगळवारी दुपारी लागलेल्या वणव्यात जलजीवन योजनेचे पाईप जळून खाक झाले. या दुर्घटनेत ठेकेदाराचे सुमारे ६ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. याबाबत सदर ठेकेदाराने देवरुख पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात तक्रार दिली आहे.

संगमेश्वर तालुक्यात वणव्यांचे प्रमाण वाढले आहे. अनेक ठिकाणी वणव्यांमुळे आंबा, काजू बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे चित्र आहे. मात्र शासनाकडून कोणतीच नुकसान भरपाई दिली जात नाही.

मंगळवारी दुपारी दीडच्या सुमारास ओझरे गणेशबाग येथील माळावर वणवा पेटला. यामध्ये जलजीवन योजनेच्या पाईपनी पेट घेतला. पाणी योजनेचे पाईप जळाल्याची प्राथमिक माहिती संबंधित ठेकेदार जनक जागुष्टे यांनी दिली आहे. तसेच अज्ञाताविरोधात देवरुख पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:56 AM 02/Jan/2025