रत्नागिरी : दि. ४ जानेवारी २०२५ रोजी सातारा विभागीय क्रीडा संकुल येथे पार पडलेल्या विभागीय शालेय पेंटथलोन स्पर्धेत महेश मिलके स्विमिंग ग्रुप च्या ९ खेळाडूंची निवड झाली होती. त्यामध्ये 17 वर्षाखालील मुली या गटात कार्तिकी भुरवणे, निधी भिडे, राजनंदिनी कीर, व 17 वर्षाखालील मुले या गटात आयुष काळे, श्रीयश विलनकर, चैतन्य कदम, मिहीर दळवी ,तसेच 19 वर्षाखालील मुले या गटात सर्वज्ञ कडगावे यांचा समावेश होता.
या स्पर्धेचे स्वरूप 1200 मिटर रनिंग-100 मीटर स्विमिंग -1200 मीटर रनिंग असे होते.
सदर स्पर्धेमध्ये महेश मिलके स्विमिंग ग्रुप च्या कार्तिकी प्रकाश भुरवणे हिने 13 मिनिट 37 सेकंड वेळ घेत 3 रा क्रमांक पटकावला. व कार्तिकी हिची 10 जानेवारी रोजी होणाऱ्या राज्यस्तरीय शालेय स्पर्धेकरिता निवड झाली आहे.
महेश मिलके स्विमिंग ग्रुप च्या सर्व खेळाडूंचा या स्पर्धे मधे अतिशय उत्कृष्ट प्रदर्शन केले आहे. सदर खेळाडूंना राष्ट्रीय जलतरणपटू व मान्यताप्राप्त राष्ट्रीय प्रशिक्षक श्री. महेश मिलके सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. कार्तिकी हिचे राज्यस्तरीय स्पर्धे करिता निवड झाल्याने तिचे तिझ्या पालकांचे तसेच मार्गदर्शक यांचे स्विमिंग ग्रुप कडून तसेच सर्व स्तरातुन अभिनंदन करण्यात येत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:06 04-01-2025














