नेहरू युवा केंद्र रत्नागिरी मार्फत गुहागर येथे सुशासन दिवस संपन्न

गुहागर : नेहरू युवा केंद्र रत्नागिरी यांचे वतीने कनिष्ठ महाविद्यालय गुहागर येथे सुशासन दिवस अत्यंत उत्साह पूर्ण वातावरणामध्ये संपन्न झाला.

कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र जनता विकास प्रतिष्ठानचे संचालक मनोज पाटील व मान्यवर यांचे शुभ हस्ते दीप प्रज्वलन व प्रतिमेला पुष्पहार करून करण्यात आले .कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री मधुकर गंगावणे हे होते.

त्यावेळी महाराष्ट्र जनता विकास प्रतिष्ठानचे संचालक मनोज पाटील, कार्यक्रम समन्वयक नितीन घरत, सामाजिक कार्यकर्ते, प्रभुनाथ देवळेकर, सुप्रसिद्ध लेखिका व व्याख्यात्या मनाली बावधनकर मॅडम, मेटकरी सर ,पालशेतकर मॅडम, गुरव मॅडम ,बचत गटाच्या अध्यक्षा आरेकर मॅडम, व बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते. त्यावेळी बोलताना प्राध्यापिका बावधनकर मॅडम म्हणाल्या सुशासनामुळे शासकीय योजनांची परिणामकारकपणे अंमलबजावणी होत असते, योग्य लाभार्थी पर्यंत पोहोचता येतं, वेळेची बचत होते व राष्ट्राच्या प्रगतीसाठी हातभार लागतो.

राष्ट्राच्या प्रगतीसाठी सुशासनाची नितांत आवश्यकता आहे. त्यावेळी पालशेतकर मॅडम, मनोज पाटील, मधुकर गंगावणे सर यांनी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन माळी मॅडम यांनी केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:22 06-01-2025