भारत आणि बांगलादेश (India vs बांगलादेशने 10 विकेट्स गमावत 233 धावा केल्या. आज सामन्यातील चौथा दिवस असून भारत आक्रमक फलंदाजी करुन सामन्यात आघाडी घेण्याचा प्रयत्न करेल.
WTC च्या फायनलमध्ये पोहचण्यासाठी हा सामना जिंकणे भारतीय संघासाठी महत्वाचे असणार आहे. मालिकेत पहिल्या कसोटी सामन्यात भारताने विजय मिळवला होता. त्यामुळे दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारतीय संघाने 1-0 अशी आघाडी घेतली आहे. बांगलादेशकडून मोमीनूल हकने दमदार शतक ठोकले. मोमीनूल हकने नाबाद 107 धावा केल्या. तर भारताकडून जसप्रीत बुमराहने सर्वाधिक 3 विकेट्स पटकावल्या. मोहम्मद सिराजने 2, रवीचंद्रन अश्विनने 2, आकाश दीपने 2 विकेट्स घेतल्या. तसेच रवींद्र जडेजाला 1 विकेट मिळाली.
रवींद्र जडेजाने रचला विक्रम-
रवींद्र जडेजाने कसोटी क्रिकेटच्या फॉरमॅटमध्ये 300 विकेट्स घेतल्या. या सामन्यातील बांगलादेशचा फलंदाज खलील अहमदची विकेट घेत इतिहास रचला. रवींद्र जडेजा कसोटीत सर्वात जलद 300 बळी आणि 3,000 धावा करणारा आशियाई खेळाडू ठरला आहे.
भारत आणि बांगलादेशची प्लेइंग इलेव्हन –
भारत- यशस्वी जैस्वाल, रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), केएल राहुल, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, आकाश दीप, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.
बांगलादेश- शादमान इस्लाम, झाकीर हसन, नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), मोमीनूल हक, मुशफिकुर रहीम, शकीब अल हसन, लिटन दास (यष्टीरक्षक), मेहदी हसन मिराज, तैजुल इस्लाम, हसन महमूद, खालिद अहमद.
आतापर्यंत सामना कसा राहिला?
27 सप्टेंबरपासून सुरू झालेल्या सामन्याच्या पहिल्याच दिवशी पावसामुळे खेळ एक तास उशिराने सुरू झाला. त्यानंतर लंच ब्रेकनंतर सामना पावसामुळे थांबवण्यात आला. यानंतर पावसामुळे चेंडू न टाकता दुसऱ्या दिवसाचा खेळ रद्द करण्यात आला. त्यानंतर तिसऱ्या दिवशीही असेच दृश्य पाहायला मिळाले. तिसरा दिवसही एकही चेंडू न टाकता रद्द करण्यात आला. तिसऱ्या दिवशी पाऊस नसला तरी ओल्या मैदानामुळे तिसऱ्या दिवशी खेळ सुरू होऊ दिला नाही. दरम्यान, दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळला गेला होता. या सामन्यात भारताने बांगलादेशचा 280 धावांनी पराभव केला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:10 30-09-2024