वुमेन्स कार्निव्हल २०२५ : सकाळच्या नाश्त्या पासून रात्रीच्या जेवणापर्यंत ताव मारायला नक्की या !

⏩ रत्नागिरी : दिनांक ९ ते १२ जानेवारी दरम्यान सकाळी १० ते रात्रौ १० या वेळेत रत्नागिरीत जयेश मंगल पार्क येथे वुमेन्स कार्निव्हल २०२५ चे आयोजन करण्यात आलंय. खऱ्या हिऱ्यांच्या आणि सोन्याच्या दागिन्यांपर्यंत विविध आकर्षक वस्तू या ठिकाणी विक्रीसाठी उपलब्ध असतात. या प्रदर्शनाला दर वर्षी मोठ्या संखेने महिला सहकुटुंब भेट देतात. याच निमित्ताने या ठिकाणी खाद्य महोत्सवाचे देखील आयोजन करण्यात येते. या खाद्य महोत्सवात सकाळी १० वाजल्यापासून रात्री १० वाजेपर्यंत चमचमीत पदार्थांची मेजवानी असते. खवैयांसाठी हि एक पर्वणीच असते. मिसळ, खिमा मिसळ, खिमा पाव, बुर्जी पाव, वजरी पाव, चाट, केक, बेकरी आयटम्स, कबाब, पाव भाजी, चायनीज, बिर्याणी, मटण वडे आदी अनेक चमचमीत पदार्थ या निमिताने रत्नागिरीतील खवैय्यांना चाखायला मिळतात. सकाळच्या नाश्त्या पासून रात्रीच्या जेवणापर्यंत ताव मारायला नक्की, या असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आलं आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:18 08-01-2025

📰➖♾️➖♾️➖♾️➖📰