खेडशीत शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली ८ लाखांची फसवणूक

रत्नागिरी : शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक करण्यास सांगत फिर्यादीची एका महिलेने तब्बल ८ लाख ३ हजार ९६९ रुपयांची ऑनलाईन फसवणूक केली. फसवणूकीची ही घटना ४ डिसेंबर ते ३१ डिसेंबर २०२४ रोजी खेडशी येथे घडली आहे. या प्रकरणी अज्ञात महिलेविरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

या बाबत सुधीर भाऊ सकपाळ (रा. श्रीनगर खेडशी, रत्नागिरी) यांनी सोमवार ६ जानेवारी रोजी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार संशयित महिला ही एसएमसी इनव्हेस्टर स्ट्रॅटेजी अपडेट या व्हॉटसअॅप ग्रुपची अॅडमिन आहे. तिने फिर्यादीशी संपर्क साधून कंपन्यांचे अप्पर सर्किट/ब्लॉक ट्रेड/एआय ट्रेडिंग/आयपीओ यांची माहिती दिली. त्यानंतर कंपन्यांच्या शेअर ट्रेडिंगबाबत गुंतवणूक करण्यास सांगून फिर्यादीच्या बँक खात्यावरून एनईएफटी तसेच युपीआयवरून रक्कम ट्रान्स्फर करून घेतली. तसेच एसएमसी ग्लोबल सेक्युरिटीस लि. या कंपनीचा लोगो असलेले अॅप्लीकेशन डाउनलोड करण्यास सांगितले. फिर्यादीने ते अॅप्लीकेशन डाउनलोड केल्यानंतर त्यात गुंतवणूक केलेल्या रकमेवर त्यांना तब्बल ५० लाख ४२ हजार ७३८ रुपयांचे प्रॉफिट झाल्याचे भासवून तो नफा सकपाळ यांना परत देण्यासाठी त्यावर त्यांच्याकडे १० टक्के कमिशन आगावू मागितले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:14 AM 08/Jan/2025