Lek Ladki Yojana Online Application: ‘लेक लाडकी’ योजनेच्या अर्जासाठी महाडीबीटी २.० पोर्टल कार्यान्वित; मंत्री आदिती तटकरे यांची घोषणा

Lek Ladki Yojana Online Application: 'लेक लाडकी' योजनेच्या अर्जासाठी महाडीबीटी २.० पोर्टल कार्यान्वित; मंत्री आदिती तटकरे यांची घोषणा

आता थेट ऑनलाइन अर्ज दाखल करण्याची सुविधा; कागदपत्रांची संख्याही केली कमी

राज्य सरकारच्या अत्यंत महत्त्वपूर्ण ‘लेक लाडकी’ योजनेच्या लाभासाठी आता अर्जदारांना महाडीबीटी २.० (MahaDBT 2.0) पोर्टलवरून थेट ऑनलाइन अर्ज सादर करता येणार आहे। या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रांची संख्या कमी करून Lek Ladki Yojana Online Application अर्ज नोंदणीपासून ते अर्जाची सद्यस्थिती पाहण्यापर्यंतची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन करण्यात आली आहे, अशी माहिती राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे।

अंगणवाडीत जाण्याची अट रद्द; नवीन ‘जीपीआर’ लागू

यापूर्वी ‘लेक लाडकी’ योजनेच्या लाभासाठी अर्जदारांना प्रत्यक्ष जवळच्या अंगणवाडी केंद्रात जाऊन अर्ज जमा करावा लागत असे। त्यानंतर हे अर्ज प्रकल्प स्तरावर एकत्रित करून तत्कालीन पोर्टलवर त्यांची नोंदणी व छाननी केली जात होती। मात्र, आता शासनाच्या योजनांच्या सुसूत्रीकरणाच्या धोरणानुसार नवीन शासन प्रक्रिया पुनर्रचना (GPR) तयार करण्यात आली आहे। यामुळे अर्जदारांना घरबसल्या स्वतः ऑनलाइन अर्ज दाखल करण्याची आणि अर्जाचा पाठपुरावा करण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे।

Arihant 2

अंगणवाडी नसलेल्या भागांतील लाभार्थ्यांना मोठा दिलासा

या नवीन ऑनलाइन व्यवस्थेमुळे विशेषतः ज्या ग्रामीण किंवा दुर्गम भागांमध्ये अंगणवाडी केंद्र कार्यान्वित नाहीत, तेथील लाभार्थ्यांना अर्ज सादर करताना येणाऱ्या अडचणी कायमच्या दूर झाल्या आहेत। राज्यातील कोणत्याही भागातील पात्र रहिवासी आता या योजनेसाठी महाडीबीटी पोर्टलद्वारे अर्ज करू शकतील।

तसेच, योजनेअंतर्गत लाभाची रक्कम थेट लाभ हस्तांतरण (DBT) पद्धतीने थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जात आहे। मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, लेक लाडकी योजनेअंतर्गत आजपर्यंत पहिला टप्प्यातील लाभ मिळालेल्या लाभार्थ्यांची संख्या २,९८,६९५ इतकी झाली आहे।