सदावर्तेंच्या विधानावर शिंदे गट आक्रमक; राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंवरही सोडले टीकेचे बाण
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पुन्हा मुख्यमंत्री होणारच नाहीत, असा दावा प्रसिद्ध वकील गुणरत्न सदावर्ते यांनी केला आहे। सदावर्तेंच्या या विधानानंतर शिंदे गटाकडून त्यांच्यावर जोरदार पलटवार केला जात आहे। शिवसेना शिंदे गटाचे नेते तथा आमदार निलेश राणे यांनी गुणरत्न सदावर्ते Nilesh Rane vs Gunaratna Sadavarte यांना थेट आव्हान दिले आहे। "एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार नाहीत हे त्यांनी कागदावर लिहून द्यावे, जर ते मुख्यमंत्री झाले नाहीत तर मी माझी संपूर्ण संपत्ती सोडून देईन," असा घणाघाती प्रतिआव्हान निलेश राणे यांनी दिले आहे।
भविष्यवाणीवर महाराष्ट्र चालत नाही; निलेश राणेंचा घणाघात
माध्यमांशी बोलताना निलेश राणे यांनी सदावर्तेंच्या दाव्याचा समाचार घेतला। "२०२२ मध्ये एकनाथ शिंदे पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले, तेव्हाही लोक हेच म्हणत होते की ते मुख्यमंत्री होणार नाहीत। पण ते मुख्यमंत्री झाले। भविष्यवाणी सांगून महाराष्ट्र चालतो का?" असा सवाल त्यांनी उपस्थित केला।

राणे पुढे म्हणाले, "आज आमच्याकडे खासदार, आमदार आणि शेकडो नगरसेवक आहेत। महाराष्ट्रात आमची शिवसेना दुसऱ्या क्रमांकाचा मोठा पक्ष आहे। अशा स्थितीत आमचा नेता मुख्यमंत्री होणार नाही तर कोण होणार? देवेंद्र फडणवीस हे माझे वरिष्ठ नेते आहेत, मात्र एक शिवसैनिक म्हणून एकनाथ शिंदे यांनी यशस्वी कार्यकाळ सांभाळला असून त्यांनी पुन्हा मुख्यमंत्री व्हावे, ही माझी इच्छा आहे."
राज ठाकरेंना टोला, तर उद्धव ठाकरेंवर ‘रिकामटेकडे’ म्हणत टीका
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना २०२९ पर्यंत महाराष्ट्रातच ठेवावे, असे विधान केले होते। त्यावर चिमटा काढत निलेश राणे म्हणाले, "राज ठाकरे हे खूप मोठे नेते आहेत, त्यांच्या पक्षाकडे अनेक खासदार, आमदार आणि नगरसेवक आहेत, त्यामुळे त्यांच्या भविष्यवाणीबद्दल आम्हाला विचार करावा लागेल."
त्याचप्रमाणे, निवडणूक आयोगाविरोधात आंदोलन छेडणाऱ्या उद्धव ठाकरेंवरही त्यांनी जोरदार निशाणा साधला। "निवडणूक आयोगाविरोधातील आंदोलनाची आयडिया ठाकरेंची नसून ती अभिजीत दीपके, सौरभ दास आणि आशुतोष रांका यांची आहे। ठाकरेंकडे आता काही काम उरलेले नाही, सगळे रिकामटेकडे झाले आहेत," अशी जहरी टीका राणेंनी केली।













