रत्नागिरी : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत १२ जानेवारी रोजी राष्ट्रीय युवा दिन

रत्नागिरी : लो. बाळ गंगाधर टिळक शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे १२ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता स्वामी विवेकानंद यांचा जयंती दिन राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे.

संस्थेतून व्यवसाय अभ्यासक्रम उत्तीर्ण झालेल्या व यशस्वी उद्योजक म्हणून नावरूपास आलेल्या माजी प्रशिक्षणार्थ्यांच्या मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात येणार आहे. यावेळी यशस्वी उद्योजकांच्या माध्यमातूनसंस्थेतील आजी व माजी प्रशिक्षणार्थीना स्वयंरोजगार आणि नेतृत्व विकास याबाबतचे मार्गदर्शन करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:21 AM 09/Jan/2025