रत्नागिरी : रेल्वे प्रवासादरम्यान महिलेकडील १५ लाखांचा ऐवज लुटला

रत्नागिरी : रेल्वे प्रवासादरम्यान महिलेची पर्स लांबवून अज्ञाताने तब्बल १५ लाख २५ हजार रुपयांचा ऐवज लांबवला. ही घटना ३ डिसेंबर २०२४ रोजी पहाटे ४.३० वा. सुमारास रत्नागिरी रेल्वे स्टेशनजवळ धावत्या रेल्वे गाडीत घडली. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात जानेवारी रोजी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी नारायण रामराव सरदेसाई (६१) यांनी तक्रार दिल आहे. त्यानुसार, २ डिसेंबर २०२१ रोजी नारायण सरदेसाई पत्नीसह मंगळुरू एक्स्प्रेसने मुंबई ते भटकळ (कर्नाटक) असा प्रवास करत होते. त्यांची गाडी खेडजवळ आली असता सरदेसाई दाम्पत्य झोपले होते. दि. ३ डिसेंबर रोजी पहाटे ४.३० वा. सुमारास रेल्वे रत्नागिरी रेल्वे स्टेशन जवळ आल्यावर नारायण सरदेसाई यांच्या पत्नीला जाग आली. तेव्हा झोपताना आपल्या डोक्याखाली ठेवलेली पर्स चोरीस गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. या पर्समध्ये ४ लाख किमतीचे हिऱ्याचे कानातले जोड, २ लाखांचे हिऱ्याचे मंगळसूत्र, ६० हजारांचे हिऱ्याचे छोटे मंगळसूत्र, ५० हजारांची हिऱ्याची नाकातील चमकी, १ लाखाची हिऱ्याची अंगठी, इतर बांगड्या, मोहन माळ, अंगठी, दोन मोबाईल असा एकूण १५ लाख २५ हजार रुपयांचा ऐवज होता. तो चोरीस गेला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:27 AM 11/Jan/2025