घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान युझवेंद्र चहल ‘बिग बॉस 18’मध्ये झळकणार?

Yuzvendra Chahal At Bigg Boss 18: भारतीय लेग स्पिनर युजवेंद्र चहल सध्या त्याची पत्नी धनश्री वर्मासोबतच्या घटस्फोटाच्या अफवांमुळे चर्चेत आहे. अद्याप, या जोडप्यानं घटस्फोटाच्या चर्चांवर कोणतंही अधिकृत वक्तव्य केलेलं नाही.

दरम्यान, घटस्फोटाच्या चर्चांमध्येच आता युजवेंद्र चहल सलमान खानच्या ‘बिग बॉस 18’ या रिअॅलिटी शोमध्ये दिसणार असल्याचं बोललं जात आहे. नुकताच तो सलमान खान होस्ट करत असलेला शो ‘बिग बॉस 18’ च्या सेटवर दिसून आला.

‘बिग बॉस 18’ च्या सेटवर युजवेंद्र चहल कॅज्युअल लूकमध्ये दिसला. त्यानं काळ्या रंगाचं टी-शर्ट आणि निळ्या रंगाची सॅल डेनिम पँट वेअर केली होती. चहलनं पिवळ्या रंगाच्या स्नीकर्ससोबत त्याचा संपूर्ण लूक पूर्ण केला होता. यादरम्यान त्याच्या हातात एक बॅकपॅकही दिसली. तो त्याच्या गाडीतून खाली उतरला आणि थेट त्याच्या व्हॅनिटी व्हॅनकडे गेला. यादरम्यान, चहलनं पापाराझींसाठी पोझ देणंही कटाक्षानं टाळलं.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:38 11-01-2025