दापोली : पैशाची मागणी आणि कामांचा खोळंबा या बाबत दापोलीतील ही नागरिकांनी महसूल तथा गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्याकडे भूमी अभिलेख कार्यालयामधील ‘त्या’ कर्मचाऱ्याबाबत तक्रार केली आहे. या तक्रारीनंतर आता या कर्मचाऱ्यांची बदली करण्यात यावी, अशी मागणी होत आहे. दापोली भूमी अभिलेख हे आर्थिक उलढालीचे केंद्र आहे. दिवसाकाठी कित्येक लोकांची येथे विविध कामांसाठी ये-जा असते. दापोलीत जमीन खरेदी विक्रीचे प्रमाण वाढल्याने नकाशे, जागा मोजणी आदी कामांसाठी पक्षकार आणि जागा खरेदी-विक्री करणारे यांची वर्दळ असते. मात्र यात सामान्य लोकांची कामे खोळंबतात. आणि आर्थिक भुर्दंड बसतो. क्षुल्लक कामासाठी पैशाची मागणी केली जाते, असा आरोप देखील लोकांचा आहे. त्यामुळे दापोली भूमी अभिलेख मधील त्या कर्मचाऱ्यांची उचलबांगडी होते का, हे पाहावे लागणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:40 PM 14/Jan/2025
