देवरुखात जिल्हा मानांकन आमदार चषक बॅडमिंटन स्पर्धा

देवरुख : रत्नागिरी बॅडमिंटन अससोसिएशनच्या मान्यतेने संगमेश्वर तालुका बॅडमिंटन अससोसिएशन आयोजित कै. बाळासाहेब पित्रे यांच्या स्मरणार्थ जिल्हा मानांकन आमदार चषक बॅडमिंटन स्पर्धा दि. १ व २ फेब्रुवारीला देवरुख येथे होणार आहे. याबाबतची माहिती पत्रकार परिषदेत स्पर्धा प्रमुख मोहन हजारे व बास्टचे सचिव रविकांत कदम यांनी दिली.

तालुक्यात बॅडमिंटन खेळाला चालना देणारे कै. बाळासाहेब पित्रे यांच्या स्मरणार्थ संगमेश्वर तालुका बॅडमिंटन असोसिएशनकडून घेतल्या जातात. यंदाची ही ५ वी मानांकन स्पर्धा आमदार शेखर निकम यांनी पुरस्कृत केली आहे. या स्पर्धा विविध गटात घेण्यात येणार आहेत. यात ११ वर्षाखालील, १३ वर्षाखालील, १५ वर्षाखालील, १७ वर्षाखालील १९ वर्षाखालील, ४० वर्षावरील ५० वर्षावरील व खुली अशा गटात यात एकेरी, दुहेरी व मिश्र दुहेरी अशी खेळवली जाणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:26 PM 14/Jan/2025