लांजा बसस्थानकातील प्रसाधनगृहाचे सांडपाणी बाजूच्या घरांच्या परिसरात

लांजा : लांजा बसस्थानकातील प्रसाधनगृहाच्या घाणीचे सांडपाणी स्थानकाच्या बाजूला असणाऱ्या घरांच्या परिसरात शिरत असल्यामुळे या पाण्याच्या दुर्गंधीमुळे राहणे कठीण झाले असून, परिसरातील नागरिकांच्या आरोग्याच्यादृष्टीने धोकादायक ठरत असल्याने या पाण्याचा तत्काळ बंदोबस्त करण्यात यावा याबाबतचे लेखी निवेदन नागरिक मुस्ताक वाणू यांनी लांजा नगरपंचायतीला दिले आहे.

लांजा बसस्थानकाशेजारी लोकवस्ती आहे. बसस्थानकातीता असणारे प्रसाधनगृहाचे पाणी सोडण्यात आले आहे. सदर चाणीचे पाणी झिरपून बाजूच्या इमारतीच्या परिसरात जात आहे. या पाण्याच्या दुर्गंधीमुळे आरोग्याला धोकादायक आहे. या सांडपाण्याची विल्हेवाट लावण्याबाबत वारंवार संबंधित अधिकारी व आरोग्य अधिक्कारी लांजा यांना लेखी कळवले असून कोणतीही कार्यवाही नाही. कित्येक दिवस या दुर्गंधीयुक्त पाण्याचा येथील नागरिकांना त्रास होत असल्याचे वणू यांनी म्हटले आहे बसस्थानकाची प्रशस्त जागा असतानाही स्थानकातील प्रसाधनगृहाच्या पाण्याचा स्थानकाच्या आवारात शोषखड्याद्वारे विल्हेवाट लावणे आवश्यक असताना बिनधास्तपणे सोडून देण्यात आल्याने सदर पाणी बाजूच्या घराच्या परिसरात झिरपत आहे, याचा त्रास होत असल्याचे मुस्ताक वणू याने नमूद केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:08 AM 15/Jan/2025