चिपळुणात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा

चिपळूण : मराठी भाषा गौरव दिन २७ फेब्रुवारी, तर १ मे रोजी मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा करण्यात येतो. मराठी भाषा संवर्धन करण्याच्या अनुषंगाने नियोजनासाठी शहरातील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात चिपळूणनगर परिषदेचे मुख्याधिकारी विशाल भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक झाली. यावेळी हे दिवस साजरे करण्याच्या दृष्टीने भोसले यांनी मार्गदर्शन केले. दि. १४ ते २७ जानेवारी दरम्यान मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा केला जाणार आहे. महाराष्ट्र राजभाषा अधिनियम अन्वये मराठी भाषा ही राजभाषा म्हणून स्वीकृत करण्यात आली आहे. दरवर्षी मराठी भाषा संवर्धन पंधरवडा दि. १४ ते २७ जानेवारी, मराठी भाषा गौरव दिन कुसुमाग्रज वि. वा. शिरवाडकर यांचा जन्मदिन २७ फेब्रुवारी, मराठी राजभाषा दिन १ मे रोजी साजरा करण्यात येणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:45 AM 15/Jan/2025