राजापूर : शेकोटी घेताना साडीने घेतला पेट; वृद्धा भाजून जखमी

रत्नागिरी : राजापूर तालुक्यातील विखारे गोठणे येथे शेकोटी घेत असताना वृध्दा ३५ टक्के भाजून जखमी झाली. तिच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ही घटना सोमवार, १३ जानेवारी रोजी सकाळी ८ वा. सुमारास घडली. जयवंती दानू काळे (वय ६०, रा. विखारे गोठणे, राजापूर) असे भाजून जखमी झालेल्या वृद्धेचे नाव आहे. सोमवारी सकाळी त्या घराशेजारील पातेरा गोळा करुन शेकोटी घेत होत्या. त्यावेळी वाऱ्याने त्यातील किटाळ उडून त्यांच्या अंगावरील साडीने पेट घेतला. ही बाब त्यांच्या नातेवाईकांच्या लक्षात येताच त्यांनी तातडीने त्यांना प्रथम राजापूर ग्रामीण रुग्णालयात नेउन अधिक उपचारांसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:49 AM 15/Jan/2025