रत्नागिरी : किरकोळ कारणातून पत्नीला लाकडी दांडक्याने मारहाण करत ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी पती व सासऱ्याविरोधात पूर्णगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारहाणीची ही घटना शनिवार, ११ जानेवारी रोजी सकाळी ८.३० वा. सुमारास मेर्वी खालची महादयेवाडी येथे घडली.
कृष्णा हरी भातडे (वय ९०) प्रकाश कृष्णा भातडे (वय ५५, दोघे रा. मेर्वी खालची महादयेवाडी, रत्नागिरी) अशी या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. त्यांच्या विरोधात सुजाता प्रकाश भातडे (वय ४०, रा. मेर्वी, खालची महादयेवाडी, रत्नागिरी) यांनी पूर्णगड पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसात दाखल तक्रारीनुसार कौटुंबिक वादातून सुजात भातडे ही सन २००८ पासून पतीपासून विभक्त होऊन घराशेजारी राहते. तिला न्यायालयाच्या आदेशाने ५ हजार रुपये पोटगी व घरातील एक खोली राहण्यासाठी दिली आहे. शनिवारी सकाळी फिर्यादी ही आपल्या मुलीसोबत बोलत होती. याचा राग आल्याने तिचा सासरा कृष्णा भातडे आणि पती प्रकाश भातडे यांना राग आला. त्यांनी फिर्यादीला तू मुलीसोबत बोलायचे नाहीस असे रागात ओरडून तिला शिवीगाळ करत तू इथे घरात रहायचे नाहीस म्हणन वाद सुरु केला. त्यानंतर दोन्ही संशयितांनी आपल्या हातांमध्ये लाकडी दांडका घेऊन पती प्रकाश भातडेने फिर्यादी पत्नी सुजाता हिच्या हातांवर, पायांवर जोराचे फटके मारुन ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी पती आणि सासऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:06 AM 15/Jan/2025
