रत्नागिरी : मनसेच्या प्रभारी शहराध्यक्षपदी मिलिंद भाटकर यांची नियुक्ती करण्यात आल्याचे पत्र जिल्हाध्यक्ष अविनाश सौंदळकर यांनी त्यांच्याकडे सुपूर्द केले. शहराध्यक्ष अद्वैत कुलकर्णी यांनी कौटुंबिक कारणास्तव शहराध्यक्ष पदावरती कार्यरत राहणे असमर्थ असल्याचे सांगितल्यानंतर ही नियुक्ती करण्यात आली.
भाटकर मनसेच्या हे स्थापनेपासून कट्टर महाराष्ट्र सैनिक म्हणून कार्यरत आहेत. अनेक आंदोलनात त्यांचा सक्रिय सहभाग होता. तसेच रत्नागिरी शहरातील अनेक समाजकार्यात त्यांचा सक्रिय सहभाग असतो. त्यासोबत शहर सचिवपदी प्रभात सुर्वे, वाहतूक सेना शहराध्यक्षपदी गौरव चव्हाण यांची देखील नियुक्ती करण्यात आली. या प्रसंगी जिल्हाध्यक्ष अविनाश सौंदळकर, उपजिल्हाध्यक्ष अरविंद मालाडकर, कामगार सेना जिल्हा चिटणीस महेंद्र गुळेकर, तालुकाध्यक्ष सचिन शिंदे, प्रभात सुर्वे, गौरव चव्हाण, तनिष सुर्वे इत्यादी उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:24 AM 15/Jan/2025
