नाणीज विज्ञाननगरी म्हणून ओळखले जावे : माणिकराव सातव

पाली : मानवी जीवनात वैज्ञानिक दृष्टिकोन हा फार महत्वाचा आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जडणघडणीतील महत्त्वाच्या टप्यावर आयोजित केलेल्या अशा प्रकारच्या विज्ञान प्रदर्शनाला फार महत्त्व आहे. नाणीजसारख्या छोटयाशा गावातील हायस्कूलने विज्ञानक्षेत्रात केलेली प्रगती पाहता येणाऱ्या काळात नाणीजची ओळख ही विज्ञाननगरी म्हणून झाली पाहिजे, असे प्रतिपादन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव माणिकराव सातव यांनी केले.

जिल्हा परिषद, माध्यमिक शिक्षण विभाग आणि माध्यमिक विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय नाणीज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ५२ व्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाच्या समारोपावेळी ते बोलत होते. शाश्वत भविष्यासाठी विज्ञान तंत्रज्ञान हो या प्रदर्शनाची संकल्पना होती.

प्रदर्शनासाठी माध्यमिक शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत, मंडळाचे अध्यक्ष प्रशांत कदम, शिक्षणाधिकारी बी. एम. कासार, उपशिक्षणाधिकारी नरेंद्र गावंड, विस्तार अधिकारी संदेश कडव, विज्ञान मंडळ अध्यक्ष सुदेश कदम, प्रकल्प अधिकारी कांबळे, मुख्याध्यापिका रूपाली सावंतदेसाई यांच्यासह शिक्षक आणि कर्मचारी उपस्थित होते.

प्रदर्शनातील प्रतिकृती स्पर्धेचा निकाल असा उच्च प्राथमिक विभाग ६ ते ८ गट विज्ञान प्रतिकृती विभाग (प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक आणि कंसात प्रतिकृती) स्पंदन धामणेची (घुमर दी स्पीन अँड जर्क लॉन्चर पार्टीसोपेट), प्रियांशू बोडस (सस्टेनेबल अॅग्रीकल्चर), राईद चौगुले (रिव्हर क्लेविंग बोट), माध्यमिक विभाग ९ ते १२ पृथ्वी राय (हाऊसहोल्ड मेथड फॉर डिटेक्शन अँड सेपरेशन ऑफ मायक्रोप्लास्टिक), ईशान पवार (हिर काढणी यंत्र), मनीष जडधार (आपत्कालीन निर्गमन प्रणाली).

उच्च माध्यमिक दिव्यांग विद्यार्थी विभाग ६ ते ८ गट प्रियवंदा शेटे (स्मार्ट कॅप अंधांची सोबती), राज बाईत (आधुनिक पावडे), वल्लभ ठाकूर (सुरक्षित हेल्मेट). इ. ९ ते १२ सानिका तांदळे (दळणवळण व वाहतूक स्मार्ट कार कंट्रोल), समीरा मोरे (दिव्यांगांसाठी स्मार्ट सुटकेस), तौसीफा महालवार (ऑटोमॅटिक फायर एक्ङिास्टर).

उच्च प्राथमिक विभाग ६ते ८ अध्यापक शैक्षणिक साहित्य विभाग सहदेव पालव (ग. सा. वि. संकल्पना), मकरंद विचारे (मनोरंजनाइत गणित), अनिरुद्ध शिंदे (खेळातून गणित). माध्यमिक विभाग ते१२ गट सत्यनारायण देसाई (आनंददायी आवर्तसारणी), विनोद बंडगर (का आणि कसे, चला शोधूया), रागिणी आरेकर (इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट), प्रयोगशाळा सहायक, परिचर शैक्षणिक साहित्य निर्मिती विभाग: शिवराज झगडे (प्रकाशित उपकरणे), प्रवीण बाणे (प्रकाश किरणांची किमया), सचिन लांब (प्रकाशाचे अपवर्तन).

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:41 AM 15/Jan/2025