रत्नागिरी : कोकण कृषी विद्यापीठांतर्गत शिरगाव येथील मत्स्य अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमाच्या तृतीय वर्षाच्या सात विद्यार्थ्यांसाठी फिश प्रोसेसिंग अँड रेफ्रिजरेशन मशिनरी या विषयांतर्गत गुजरात येथे कार्यानुभव प्रशिक्षण घेण्यात आले.
विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय भावे, शिक्षण संचालक डॉ. सतीश नारखेडे आणि सहयोगी अधिष्ठाता कृषी तंत्रज्ञान शिक्षण डॉ. ठोकळ यांच्या मार्गदर्शनाखाली गुजरातमधील निशिंडो फुड्स वेरावळ येथे हे प्रशिक्षण झाले. कार्यक्रमात जान्हवी कदम, वेदांती शिर्के, मौसमी कोयांडे, कृतज्ञता पाटील, अर्चिता पाटील, श्रावणी बाणे आणि ओमकार कांबळे हे विद्यार्थी सहभागी झाले आहेत. फिश
प्रोसेसिंग तंत्रज्ञान, रेफ्रिजरेशन तंत्रज्ञान, सुक्ष्म जीवशास्त्र, विविध मुल्यवर्धी मत्स्यपदार्थ निर्मिती, त्यांचे व्यवस्थापन व मार्केटिंगविषयक मार्गदर्शन करण्यात आले. सहाय्यक प्रा. तोसिफ काझी कार्यानुभव कार्यक्रमाचे समन्वय म्हणून काम पाहत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:48 AM 15/Jan/2025
