ठेकेदारांच्या समस्या समजून घेऊ : मंत्री योगेश कदम

खेड : मंत्री योगेश कदम यांच्या खेड दौऱ्यावेळी खेड तालुका ठेकेदार संघटनेने भेट घेतली. यावेळी कदम यांनी ठेकेदारांना येणाऱ्या अडीअडचणी समजून घेतल्या. खेड तालुका ठेकेदार संघटनेचे अध्यक्ष शैलैश कदम यांच्यासह सचिन रेडीज, मल्लूशेठ राठोड, प्रशांत सावंत, दीपक डोंगरे, रवींद्र गौडा, दीपक भांबड, मारूती पवार, आसिफ काझी नवलेशेठ आदी पदाधिकारी उपस्थित होते.

या वेळी ठेकेदार संघटनेचे अध्यक्ष शैलेश कदम यांनी ठेकेदाराला उद्भवणाऱ्या अडचणी, प्रशासकीय समस्या याबाबत माहिती मंत्री कदम यांनी दिली. यावेळी मंत्री कदम यांनी सर्वच समस्या समजून घेताना भविष्यात ठेकेदारांना पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:31 15-01-2025